सत्वान्न पिठांची गुणवत्ता

 • शुभारंभ सत्त्वपूर्ण अन्नाचा...

  सत्वान्नची उत्पादक कंपनी-श्रेयस कुलकर्णी फ्लोअर्स प्रा.ली. हि खाद्यपीठे बनवणारी केवळ आणखी एक कंपनी नसून खरोखर १०० % पीठे देण्याचा वसा घेऊन जन्माला आलेली कंपनी आहे. अर्थातच उत्पादनाची उत्तम गुणवत्ता हाच ह्या कंपनीच्या यशाचा भक्कम पाया आहे.

 • सत्वान्न पीठे.... गुणवत्तापूर्ण पीठे.

  सत्वान्न पीठे हि नावाप्रमाणेच अन्नातील सत्वांश तुमच्यापर्यंत पोहोचवणारी पीठे आहेत. परिवाराच्या उत्तम आरोग्यासाठी आहारात सत्वपुर्ण अन्नाचा समावेश असायला हवा. हा प्रत्येक गृहिणीचा आग्रह सत्वान्न पीठे पूर्ण करतात.

 • दाण्यादाण्यात गुणवत्ता.... कणाकणात शुद्धता

  सत्वान्न पीठ तयार करण्यापूर्वी जाणकारांकडून धान्याची कसून पारख केली जाते. अद्ययावत यंत्रणेच्या साहाय्याने शुद्धता व स्वच्छता राखण्यासाठी काटेकोर दक्षता घेतली जाते. धान्य दळताना दुसरे कोणतेही धान्य अथवा पीठ त्यात मिसळले जाऊ नये, यासाठी सतत काळजी घेतली जाते. त्यामुळे सत्वान्न पीठ असते प्रत्येक वेळी १०० टक्के शुद्ध!

 • १००% शुद्धता कायम ठेवणार पॅकिंग

  पिठातील सत्वांश आणि ताजेपणा तुमच्यापर्यंत जसाच्या तसा पोहोचवण्यासाठी प्रमाणित फूट-ग्रेडचे पॅकिंग केले जाते. आणि पिठांचे योग्य वजन करूनच पॅकिंग प्रक्रिया पूर्ण होते.

 • नाशिकमध्ये उत्पादन, ताज्या पिठांचे वितरण

  सत्वान्न पीठे नाशिकमध्ये तयार होतात आणि इथेच वितरित होतात, तुम्ही नुसत्या दळून आणलेल्या पिठाच्या तोडीस तोड असतो ह्याचा ताजेपणा. सत्वान्नच्या गुणवत्तेची पावती देणाऱ्या गृहिणींची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे, आणखी काय हवं ?