x

सत्वान्न पीठे तयार होतात, तेव्हा धान्य दळताना इतर धान्य किंवा पीठे त्यात मिसळली जाऊ नये, याची काटेकोर काळजी घेतली जाते. त्यामुळे कुठल्याही पदार्थात सत्वान्न वापरून पहा, उत्कृष्ट गुणवत्तेची पावती लगेच मिळते.

सत्वांन्नच्या होम डिलिव्हरीमुळे मोकळा वेळ मिळतो. दुकानापर्यंत जाण्या-येण्यात वेळ न जाता, ओझे न उचलता दर्जेदार खाद्यपीठे मिळतात. . . ती देखील थेट उत्पादकाकडून तुमच्या घरी.

सत्वान्नची थालीपीठ म्हणजे खमंग भाजलेल्या धान्याचं अचुक मिश्रण ! कसून पारख करून हि धान्ये घेतली जातात. अद्ययावत यंत्रणेद्वारे शुध्दता व स्वच्छतेची सातत्याने दक्षता घेतली जाते. साहजिकच, सत्वान्नची थालीपीठे होतात मस्त खुशखुशीत !

श्रेयस कुलकर्णी प्रा. लि. ला सकाळी १० ते रात्री ७ ह्या वेळेत कॉल करून पीठे ऑर्डर केली कि त्या किंवा दुसऱ्या दिवशी होम डिलिव्हरी मिळते. अगदी १ किलो पीठ मागवलंत तरीसुद्धा ! कॅश ऑन डिलिव्हरी ! शिवाय सोबत सत्वान्न उत्पादनाची माहिती आणि रेसिपी पुस्तिका मोफत !!

केवळ कॉल करून विनाभेसळ पीठ घरपोच मिळण्याचा मोठा दिलासा देते सत्वान्न. तब्बल १५ प्रकारची पीठे...विशेष म्हणजे, कोणत्याही किराणा विक्रेत्यामार्फत नाही तर ती येतात थेट उत्पादकाकडून तुमच्या घरी...नुकतीच दळलेली !

इतकी शुद्ध पीठे बनवणं त्यांनाच जमत, जे वापरतात दर्जेदार धान्ने, आधुनिक यंत्रणा, प्रमाणित प्रक्रिया आणि अचुक गुणवत्ता नियंत्रित पद्धती. नेमक्या याच ४ वैशिष्ट्यामुळे सत्वान्न इतरांपेक्षा सरस ठरते. आणि याची पक्की खात्री पटते ते म्हणजे पदार्थ बनवून आणि खाऊन पाहिल्यावरच!

रोजच्या ताणतणावाशी सामना करण्यासाठी आवश्यक आहे बळकट प्रतिकारशक्ती आणि आरोग्य, जे मिळायला हवं अन्नातून! म्हणूनच प्रत्येकासाठी गरजेचं आहे १०० टक्के शुद्ध सत्वान्न. जे वापरतात सत्वान्न, ते राहतात आरोग्य संपन्न !

तुमच्या मुलासाठी आहाराचे धडे प्रत्यक्ष कृतीत आणण्याची जबाबदारी सत्वान्नने उचललेली आहे. सत्वपुर्ण आणि सुरक्षित पिठाचा वापर हि एक चांगली सवय आहे. हे आता तुम्ही मुलांना सांगू शकता. शरीराला आवश्यक घटकांनी युक्त असं शुद्ध सत्वान्न वापरू!

रेसिपि बुक डाउनलोड करा

  • नाव * :
  • मोबाईल नंबर * :
  • ई-मेल :
  • शहर :