नेहमी विचारले जाणारे प्रश्न

 • सत्वान्न पीठे कश्यामुळे सर्वात सरस पीठे ठरतात ?
  ह्याचे एक कारण नाही तर अनेक वैशिट्यपूर्ण कारणे आहेत, जसे
  • हि पीठे १००% शुद्ध आहेत.
  • हि उत्पादकडून थेट घरपोच मिळतात.
  • हि घरबसल्या ऑर्डर करता येतात.
  • हि अनेक धान्य-प्रकारात उपलब्ध आहेत.
  • हि पीठे कमीत कमी मागवली किंवा कुठलंही एक पीठ मागवलं तरी होम डिलिव्हरी मिळते आणि तीही फ्री !
  • सर्वात महत्वाच म्हणजे, सत्वान्नमुळे पदार्थ बनतात सत्वपुर्ण, पौष्टिक आणि रुचकर
 • सत्वान्न पीठे १०० टक्के शुद्ध आहेत म्हणजे काय ?
  सत्वान्न पीठ तयार करण्यापूर्वी जाणकारांकडून धान्याची कसून पारख केली जाते. अद्ययावत यंत्रणेच्या साहाय्याने शुद्धता व स्वच्छता राखण्यासाठी काटेकोर दक्षता घेतली जाते. धान्य दळताना दुसरे कोणतेही धान्य अथवा पीठ त्यात मिसळले जाऊ नये, यासाठी सतत काळजीपूर्वक पाहिलं जाताच, शिवाय पिठातील सत्वांश आणि ताजेपणा तुमच्यापर्यंत जसाच्या तसा पोहोचवण्यासाठी प्रमाणित फूट-ग्रेडचे पॅकिंग केले जाते. त्यामुळे सत्वान्न पीठ असते प्रत्येक वेळी १००% शुद्ध!
 • सत्वान्न पीठे कुठे तयार होतात ?

  सत्त्वान्न


  नाशिक मधे
  श्रेयस कुलकर्णी फ्लोअर्स प्रा. लि.
  डी-११, सातपूर एम. आय. डी. सी., नाशिक-४२२००७

 • पौष्टिक अन्नाची गरज सत्वान्नमुळे कशी पूर्ण होते ?
  रोजचा नाश्ता आणि भोजनातील अनेक पदार्थात सत्वान्न वापरता येते. सत्वान्नचे उत्पादन होताना धान्यातील सत्वांश कायम राखण्याची काळजी घेतल्यामुळे धान्यातील कर्बोदके, प्रथिने, स्निग्धांश, जीवनसत्वे जास्तीत जास्त प्रमाणात मिळतात. शरीराला आवश्यक असणारी पोषकतत्वे सत्वान्नच्या काटेकोर उत्पादन पद्धतीमुळे पिठामद्धे पुरेपूर उतरतात.
 • कोणकोणत्या प्रकारची सत्वान्न पीठे, किती प्रमाणात मिळतात ?
  • गहू (सिहोर) पीठ १ कि., ५ कि., १० कि.
  • गहू (लोक्वान) १ कि., ५ कि., १० कि.
  • ज्वारी पीठ १/२ कि.
  • बाजरी पीठ १/२ कि.
  • तांदूळ पीठ १/२ कि.
  • बेसन १/२ कि., १ कि.
  • नाचणी पीठ १/२ कि.
  • कुळीथ पीठ १/२ कि.
  • सोया पीठ २०० ग्रॅम
  • मका पीठ २०० ग्रॅम
  • साबुदाणा पीठ २०० ग्रॅम
  • राजगिरा पीठ २०० ग्रॅम
  • शिंगाडा २०० ग्रॅम
  • स्पेशल थालीपिठ भाजणी १/२ कि.
  • स्पेशल उपवास भाजणी १/२ कि.
 • सत्वान्न पीठे कुठे मिळतात ?
  सत्वान्न पीठे कोणत्याही मॉलमध्ये किंवा दुकानात मिळत नाहीत. हि पीठे फक्त फ्री होमी डिलिव्हरी पद्धतीने वितरित होतात. तुमची ऑर्डर नोंदविण्यासाठी श्रेयस कुलकर्णी फ्लोअर्स प्रा. ली. नाशिक येथे ९८५०८८४४९९ ह्या नंबरवर फक्त एक कॉल किंवा ऍप द्वारे ऑर्डर बुक करा करा आणि बाकी सर्व कंपनीवर सोपवा.
 • सत्वान्न पीठे कोणकोणत्या भागात वितरित होतात ?
  सत्वान्न पीठे नाशिक, महाराष्ट्र (भारत) येथे उपलब्ध आहेत. संपूर्ण नाशिक शहर , पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड शहर येथे तुमच्या पत्त्यावर सत्वान्न पीठे मिळतात
 • सत्वान्न पिठांचे पेमेंट कसे व कोठे करता येते ?
  तुमच्या ऑर्डरप्रमाणे सत्वान्न पीठे घेऊन डिलिव्हरी देणारी व्यक्ती तुमच्या घरी येईल. त्या व्यक्तीकडे तुम्ही पिठाचे रोख पैसे द्यावयाचे आहेत. होम डिलिव्हरी पूर्णपणे मोफत असून फक्त पिठांची किंमत द्यावी.
 • घरपोच म्हणून सत्वान्न पीठे महाग आहेत का ?
  सत्वान्न पीठे महाग तर नाहीतच, उलट ह्या पिठांच्या प्रत्येक खरेदीवर डिस्काउंट मिळतो .