मागे जा

साबुदाणा व शेंगदाणा लाडू

साहित्य :

एक वाटी सत्वान्न साबुदाणा पीठ,
पाऊण वाटी तूप,
एक वाटी शेंगदाणा कूट,
दीड वाटी पिठीसाखर

कृती :

सत्वान्न साबुदाणा पीठ तुपावर लालसर होईपर्यंत खमंग भाजावे. गॅस बंद करून त्यात पिठीसाखर व शेंगदाणा कूट घालावे. तुपाच्या हाताने लाडू वळावेत. मिश्रण कोरडे वाटल्यास वरून थोडे थोडे तूप पातळ करून घालावे व लाडू वळावेत.