मागे जा

नाचणीची भाकरी

साहित्य :

२ कप सत्वान्न नाचणीचे पीठ,
अंदाजे दीड ते दोन कप गरम पाणी,
१ टीस्पून लोणी किंवा तूप,
१-२ टीस्पून मीठ.

कृती :

१. पातेल्यात पाणी गरम करून त्यात १ टीस्पून लोणी सोडावे, पाणी चांगले गरम झाले कि परातीत सत्वान्न नाचणीचे पीठ आणि मीठ घालून मिक्स करावे, त्यात पाणी बेताबेताने ओतावे. हळू हळू मिक्स करून मळावे, पीठ चांगले मळले गेले पाहिजे.
२. मळलेल्या पिठाचे ४ किंवा ५ गोळे करावे व लगेच भाकरी करायला घ्यावी.
३. तवा गरम झाला कि गॅस मिडीयम हाय हिटवर ठेवावा. मळलेल्या पिठाचा गोळा कोरड्या पिठात बुडवून हलक्या हाताने लाटावा.
४. भाकरी तव्यावर टाकावी वरच्या बाजूने हाताने किंवा सुती कापडाने पाणी लावावे, भाकरी पलटावी व दुसऱ्या बाजूने भाजावी.