मागे जा

दूध मलई पराठा

साहित्य :

तीन वाट्या बारीक सत्वान्न कणिक,
एक वाटी सत्वान्न सोयाबीनचे पीठ,
अर्धी वाटी सत्वान्न बेसन पीठ,
उकडलेल्या दुधी भोपळ्याचा लगदा दोन वाट्या,
कोथिंबीर बारीक चिरून पाव वाटी,
जिरे,
मिरच्या,
मीठ,
चार चमचे साय,
तूप,
सत्वान्न तांदुळाची पिठी.

कृती :

१. भोपळ्याच्या फोडी व साय घालून एकजीव कराव्यात.
२. तूप, पिठी सोडून सर्व पदार्थ घालावेत.
३. कणिक भिजवावी. लगेच पिठीवर पराठा लाटावा.
४. तूप सोडून दोन्ही बाजूनी भाजावा.
५. फुटाण्याची डाळ भाजून मिक्सरमधून काढावी व फोडणी द्यावी.
६. हा डाळकुट दह्यात कालवून त्याच्याबरोबर पराठा खावा.