मागे जा

कॉर्न टिक्की

साहित्य :

दोन वाट्या मक्याचे कोवळे दाणे,
दोन वाट्या मटार दाणे,
चार मिरच्या,
कोथिंबीर,
चाट मसाला,
जिरे पूड,
चार चमचे सत्वान्न कॉर्न(मका) पीठ,
मीठ,
बारीक रवा,
तळण्यासाठी तेल.

कृती :

मक्याचे दाणे, मटार दाणे, मिरच्या व कोथिंबीर मिक्सरमध्ये रवाळ वाटावे . त्यामध्ये चाट मसाला, जिरे पूड, मीठ, सत्वान्न कॉर्न(मका) पीठ घालून मळावे. मिश्रणाच्या चपट्या टिक्क्या बनवाव्यात. रव्यामध्ये टिक्की घोळून गरम तेलात खरपूस तळून सॉसबरोबर सव्र्ह कराव्यात.