मागे जा

अंगुरी पराठा

साहित्य :

बारीक चाळलेली सत्वान्न कणिक,
बिनबियांच्या द्राक्षांचा रस दीड वाटी,
चाट मसाला दीड चमचा ,
तूप,
सत्वान्न तांदळाची पिठी.

कृती :

१. रसात मावेल एवढी सत्वान्न कणिक मीठ, मसाला घालून भिजवावी.
२. पिठावर पराठा जाडसर लाटावा.
३. दोन्ही बाजूनी भाजावा. खाली काढून तूप लावावे.
४. खोबऱ्याच्या चटणीबरोबर चविष्ट लागते.